शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी १० जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 12:21 IST

या प्रकरणी संशयित १० जणांना अटक करण्यात आली असून इतर पंधरा ते वीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

- मारोती चिलपिपरे कंधार: लोहा मतदार संघातील जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन सुरनर यांच्या प्रचारासाठी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आले होते. कंधार तालुक्यातील कौठा येथे प्रचार सभेसाठी जाताना बाचोटी येथे शंभर ते दीडशे तरुणांच्या जमावाने त्यांच्या गाडीचा ताफा अडवला. हातामध्ये काळे झेंडे असलेल्या जमावाने 'एक मराठा, लाख मराठा', अशा घोषणा देत हाके यांच्या गाडीच्या मागच्या बाजूच्या काचा फोडल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. याप्रकरणी कंधार पोलिसांनी संशयित १० जणांना ताब्यात घेतले असून इतर १५ ते २० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

कंधार तालुक्यातील कौठा येथे ओबीसी नेते हाके जात असताना बाचोटी येथे रात्री साडेआठच्या सुमारास  १०० ते १५० आंदोलक तोंडास कपडा बांधून एक मराठा लाख मराठा घोषणा देत रस्त्यात उभे होते. त्यांनी हाके बसलेली चारचाकी गाडी (एम.एच. ५० एल. ३४५) अडवली. त्यानंतर काही जण गाडीच्या बोनेटवर चढले, तर काहींनी मागच्या बाजूच्या काचा फोडल्या. यावेळी ओबीसी कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. त्यांनीही घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले. ओबीसी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या करून घोषणा दिल्या. 

दरम्यान, पोलीस जमाव पांगवत असताना पोलिसांशी हुज्जत घालून जमावाने 'एक मराठा, लाख मराठा', अशी घोषणाबाजी सुरूच ठेवली. झटापटीत पोलीस अंमलदार यांना जखमी करून जमावाने शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी कंधार पोलिसांनी ८ रोजी फिर्यादी विकास भगवान कोकाटे सहा. पोलीस निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून आरोपी रघुनाथ हनुमंता धोंडगे, रमेश केशवराव धोंडगे, शिवशंकर मारोतराव धोंडगे, दत्ता गोविंदराव वरपडे, यादव जगन्नाथ वरपडे, दत्ता रामजी धोंडगे, बालाजी रघुनाथ वरपडे, सचिन शिवाजी दूरपडे, हनुमंत शिवाजी दूरपडे, शिवशंकर बळीराम धोंडगे या संशयित  १० जणांना ताब्यात घेतले असून व इतर १५ ते २० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सर्व बाचोटी येथील राहणार असून अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगोले हे करीत आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकlaxman hakeलक्ष्मण हाकेloha-acलोहा