शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

जि. प. निवडणुकीचे काम उधारीवर : प्रशासनाला हवे ६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 23:50 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनाला ६ कोटींच्या निधीची गरज आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत एक रुपयाही पाठविण्यात आला नसल्याने उधारीवर काम करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देआयोगाकडून एक रुपयाही निधी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनाला ६ कोटींच्या निधीची गरज आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत एक रुपयाही पाठविण्यात आला नसल्याने उधारीवर काम करण्याची वेळ आली आहे. एका मतदारामागे ४० रुपये प्रमाणे ६ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. निधी प्राप्त झालेला नसला तरीसुद्धा जिल्हा प्रशासन आपल्या स्तरावर सगळी तयारी करीत आहे. जिल्ह्यात एकूण १८२८ केंद्रांवर मतदान होणार आहे. १३ तालुक्यांसाठी तहसीलदार संवर्गातील १३ अधिकारी साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. ५८ सर्कलसाठी एकूण २२५ झोन तयार करण्यात आले आहेत. मतदानासाठी २०१२ कंट्रोल तर ४०२४ बॅलेट युनिट उपलब्ध आहेत. मशीन बंद पडल्यास दहा टक्के मशीनसाठा अतिरिक्त देण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या ५८ व पंचायत समितीच्या ११६ जागेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ४२ अर्ज अवैध ठरले आहे. यात जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या २६ अर्जाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी ४२५ उमेदवार तर पंचायत समितीसाठी ६७० उमेदवार वैध आहे. ३० डिसेंबर रोजी ११ ते ३ या दरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे.अपील करण्याची आज शेवटची तारीखजिल्हा परिषदच्या ५८ जागांसाठी ४४१ अर्ज प्राप्त झाले असून यातील ७२ अर्ज अवैध ठरविण्यात आली आहेत. काही अर्ज तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येते. अर्ज अवैध ठरवल्यास जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करण्याची तरतूद असून शुक्रवार अपील करण्याची शेवटची मुदत आहे.

 

 

 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूकfundsनिधी