जि.प.भरतीची बोगस जाहिरात

By Admin | Updated: September 21, 2015 03:00 IST2015-09-21T03:00:33+5:302015-09-21T03:00:33+5:30

भारत सरकारच्या प्रसार भारती विभागाच्या (दूरदर्शनच्या)नावावर बोगस जाहिरात प्रसिद्ध करून बेरोजगारांची फसणूक करण्याचा प्रकार घडला असतानाच...

Zombie bogus advertisement | जि.प.भरतीची बोगस जाहिरात

जि.प.भरतीची बोगस जाहिरात

बेरोजगारांची थट्टा : आमिषाला बळी न पडण्याचे प्रशासनाचे आवाहन
नागपूर : भारत सरकारच्या प्रसार भारती विभागाच्या (दूरदर्शनच्या)नावावर बोगस जाहिरात प्रसिद्ध करून बेरोजगारांची फसणूक करण्याचा प्रकार घडला असतानाच नागपूर जिल्हा परिषदेतील विविध १८९ पदाच्या भरतीची बोगस जाहिरात नोकरी डॉट कॉम या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमुळे विदर्भातील अनेक बेरोजगार तरुणांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
नागपूर जि.प.तर्फे सन २०१५ मध्ये १८१ पदाची भरती असल्याची बोगस जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात परिचर -५३, स्थापत्य अभियांत्रिकी -३१, कंत्राटी ग्रामसेवक -२९, आरोग्य सेवक -२०, कनिष्ठ सहायक १०, कनिष्ठ सहायक लेखा -८, विस्तार अधिकारी कृषी -१ आदी पदांचा यात समावेश आहे. नोकरी डॉट कॉम या संकेत स्थळावर अंकुश गुप्ता यांच्या नावावर २ सप्टेंबरला ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. १६ सप्टेंबर २०१५ ही अर्ज करण्याची अखेरची तारीख होती. परंतु जि.प.मध्ये तूर्त पदभरती नाही. अशा प्रकारची कोणतीही जाहिरात प्रसिद्धीला दिलेली नसल्याचा खुलासा प्रशासनाने केला आहे.
खोडसाळपणा म्हणून ही जाहिरात दिली आहे. जाहिरातीत अर्जासाठी खुल्या प्रवर्गाकरिता १५० रुपये व मागासवर्गीयासाठी ७५ रुपये शुल्काचा भरणा करण्याचे सुचविले आहे. मात्र शुल्क भरण्यासाठी जि.प.चा स्टेट बँकेतील खाते क्रमांक दिला आहे.
त्यामुळे खोडसाळपणे ही जाहिरात दिली आहे. बेरोजगार युवकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन जि.प.प्रशासनाने केले आहे. यात बेरोजगार युवकांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागणार आहे. या बोगस जाहिरातीमुळे बेरोजगार युवकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा जि.प.प्रशासनाने तपास करावा, अशी मागणी कास्ट्राईब जि.प.कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोहन चवरे व सचिव नरेन्द्र धनविजय यांनी केली आहे.(प्रतिनिधी)

पोलिसात तक्रार
जिल्हा परिषद प्रशासनाने नोकरभरती संदर्भात कोणतीही जाहिरात दिलेली नाही. खोडसाळपणा म्हणून ही जाहिरात दिली आहे. या संदर्भात पोलीस विभागाच्या सायबर क्राईमकडे तक्रार करण्यात आली आहे. पोलीस तपासात या प्रकरणातील आरोपी स्पष्ट होईल. बेरोजगार युवकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये.
शिवाजी जोंधळे , मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.

Web Title: Zombie bogus advertisement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.