कारच्या धडकेत ‘झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय’ जखमी
By दयानंद पाईकराव | Updated: December 30, 2023 15:43 IST2023-12-30T15:42:51+5:302023-12-30T15:43:11+5:30
गौरव भोला मोगरे (वय २४ रा. आनंदविहार, बेसा) असे जखमी झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे.

कारच्या धडकेत ‘झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय’ जखमी
नागपूर : भरधाव कारने धडक दिल्यामुळे झोमॅटोची डिलिव्हरी देण्यासाठी जात असलेला डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाला. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संत तुकाराम चौकात सोमवारी मध्यरात्री १.०६ वाजताच्या सुमारास घडली.
गौरव भोला मोगरे (वय २४ रा. आनंदविहार, बेसा) असे जखमी झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. २५ डिसेंबरला मध्यरात्री तो डिलेव्हरी देण्यासाठी आपली दुचाकी क्रमांक एम. एच. ४९, बी. जे-९९८५ ने जात होता. संत तुकाराम चौकात भरधाव वेगात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारचालकाने आपल्या ताब्यातील वाहन वेगाने व निष्काळजीपणे चालवून गौरवच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात गौरव खाली पडून त्याच्या पायाला व मांडीला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पळून गेला. गौरवचा तिरंगा चौकातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध कलम २७९, ३३८, सहकलम १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.