शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

जिल्हा परिषद अध्यक्षांचे पती कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:51 AM

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार ऊर्फ बबलू बर्वे हेसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.

ठळक मुद्देअधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये भरली धडकी : जिल्हा परिषदेतही कोरोनाचा शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार ऊर्फ बबलू बर्वे हेसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. गेल्या तीन ते चार दिवसापूर्वी ते जि.प.मध्ये आले होते. दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे. या सर्वांच्या बुधवारी तपासण्यासुद्धा झाल्या आहेत.यापूर्वी शिक्षण विभागातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर जवळपास ५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. यात सर्वच निगेटिव्ह निघाले. आता जि.प. अध्यक्षांच्या पतीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. अध्यक्षांचे पती जिल्हा परिषद कार्यालयात आणि अध्यक्षांच्या बंगल्यावर असतात. अनेक बैठकांच्या वेळी ते उपस्थित राहत असल्याची चर्चा आहे. अध्यक्षांच्या कार्यालयात सर्व पदाधिकारी, अधिकाऱ्यांची वर्दळ राहते. त्यामुळे सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत अध्यक्ष व त्यांच्या कुटुंबीयांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे समजते.कामठी-कन्हान कोरोनाचे हॉटस्पॉटजि.प. अध्यक्ष यांचे सर्कल कन्हानमध्ये आहे. त्यांचे राहणेसुद्धा कन्हान परिसरातच आहे. कामठी आणि कन्हान सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून येथून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. अध्यक्षांच्या पतीला शनिवारी ताप आला. त्यांनी कोरोनाची तपासणी केली असता, ते पॉझिटिव्ह निघाले. मंगळवारी अध्यक्षांनीही कामठीमध्ये आढावा सभा घेतल्याची माहिती आहे.पदाधिकाऱ्यांची रॅपिड अ‍ॅण्टिजेन टेस्ट, अधिकारी कर्मचाऱ्यांचेही घेतले स्वॅबिंगअध्यक्षांचे पती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांची रॅपिड अ‍ॅण्टिजेन टेस्ट करण्यात आली. त्यात पदाधिकारी निगेटिव्ह निघाल्याची माहिती आहे. तर हायरिस्कमध्ये असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेऊन मेडिकलला पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल गुरुवारी येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर