जिल्हा परिषदेतील सिलिंग फॅनने घेतला पेट ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:48 IST2021-02-05T04:48:27+5:302021-02-05T04:48:27+5:30
नागपूर : जिल्हा परिषदेतील आराेग्य विभागाच्या एका कक्षातील सिलिंग फॅनने अचानक पेट घेतल्याने एकच गाेंधळ उडाला. अतिरिक्त जिल्हा आरोग्य ...

जिल्हा परिषदेतील सिलिंग फॅनने घेतला पेट ()
नागपूर : जिल्हा परिषदेतील आराेग्य विभागाच्या एका कक्षातील सिलिंग फॅनने अचानक पेट घेतल्याने एकच गाेंधळ उडाला. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कक्षातील हा फॅन असल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळच्या सुमारास ही घटना घडली, ज्यामुळे कार्यालयात काही काळ तणाव निर्माण झाला हाेता. विभागाचे शिपाई राऊत यांनी प्रसंगावधान साधून आग विझविली, त्यामुळे अनर्थ टळल्याचे बाेलले जात आहे.
जिल्हा परिषदेत ही घटना सकाळी ९ ते १०.३० वाजताच्या दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार आराेग्य अधिकाऱ्यांच्या कक्षातील पंख्याच्या तारांनी अचानक पेट घेतला. त्यामुळे विभागात सर्वदूर धूर पसरल्याचे चित्र हाेते. अचानक आग लागल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. कामकाजही ठप्प पडले. दरम्यान आराेग्य विभागाचे शिपाई राऊत हे घटनास्थळीच हाेते. वेळेतच धोका ओळखून आरोग्य विभाग असलेल्या जुन्या इमारतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. शिपाई राऊत यांनी धावपळ करीत पाणी आणि मातीचा वापर करून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अल्पावधीतच आग विझल्याने कर्मचारी व अधिकारी यांनी सुटकेचा श्वास सोडला. शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे कारण सांगितले जात असून, यात काही वायर्स आणि प्लग जळल्याचे समजते. काही दस्तावेजसुद्धा जळल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील चाैकशी सुरू आहे. कर्मचारी उपस्थित नसते तर माेठा अनर्थ घडला असता, असेही बाेलले जात आहे.