शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
4
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
5
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
6
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
7
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
8
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
9
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
10
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
11
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
12
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
13
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
14
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
15
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
16
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
17
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
18
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
19
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!

युग चांडकच्या मारेकऱ्यांना आजन्म कारावास : फाशीची शिक्षा रद्द 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 23:26 IST

सर्वोच्च न्यायालयाने आठ वर्षीय निरागस बालक युग चांडक याच्या खून प्रकरणातील नराधम आरोपी राजेश धन्नालाल दवारे (२७) व अरविंद अभिलाष सिंग (२८) यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना आजन्म कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाने आठ वर्षीय निरागस बालक युग चांडक याच्या खून प्रकरणातील नराधम आरोपी राजेश धन्नालाल दवारे (२७) व अरविंद अभिलाष सिंग (२८) यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना आजन्म कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली. तसेच, आरोपींना मरेपर्यंत कारागृहात ठेवण्यात यावे आणि त्यांना २५ वर्षे कारावास भोगल्याशिवाय शिक्षामाफी देण्यात येऊ नये असे निर्णयात स्पष्ट करून शिक्षेची कठोरता वाढवली.न्या. उदय ललित, न्या. इंदू मल्होत्रा व न्या. हेमंत गुप्ता यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ४ फेब्रुवारी २०१६ रोजी सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३६४-अ (खंडणीसाठी अपहरण) अंतर्गत मरेपर्यंत फाशी, कलम ३०२ (खून) अंतर्गत मरेपर्यंत फाशी आणि कलम २०१ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत ७ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. ५ मे २०१६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निर्णय जसाच्या तसा कायम ठेवला होता. त्यामुळे आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची फाशी रद्द केली असली तरी, त्यांना या सर्व गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारतर्फे वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी, फिर्यादी डॉ. मुकेश चांडकतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा व अ‍ॅड. राहील मिर्झा तर, आरोपींतर्फे अ‍ॅड. युग चौधरी व अ‍ॅड. अजितसिंग पुंदीर यांनी कामकाज पाहिले.सर्वोच्च न्यायालयाचे अंतिम निरीक्षणकोणतेही परिश्रम न घेता झटपट श्रीमंत होण्याच्या उद्देशाने आरोपींनी युगचे अपहरण केले व खंडणी मागितली. तसेच, प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात आल्यानंतर युगचा निर्घृण खून केला. परंतु, कायद्यानुसार आरोपींना दूर्मिळातल्या दूर्मिळ घटनेतच फाशीची शिक्षा सुनावता येते आणि ही घटना या निकषात बसण्यामध्ये थोडक्यात कमी पडते असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने हा सुधारित निर्णय देताना नोंदवले.असे आहे प्रकरणआरोपी राजेश कळमन्यातील वांजरी ले-आऊट तर, अरविंद जरीपटक्यातील प्रीती ले-आऊट येथील रहिवासी आहे. राजेश हा युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्या रुग्णालयात कर्मचारी होता. तो रुग्णालयात हेराफेरी करीत होता. रुग्णांना अतिरिक्त पैसे मागत होता. त्याच्या तक्रारी डॉ. चांडक यांना मिळाल्या होत्या. युग नेहमीच रुग्णालयात जात होता. त्यालाही राजेशची हेराफेरी दिसून आली होती. त्यावरून एक दिवस राजेशने युगला थापड मारली होती. डॉ. चांडक यांनी राजेशचे हे कारनामे पाहून त्याला फटकारले होते आणि कामावरून काढून टाकले होते. त्याचा राग राजेशच्या मनात होता. त्यातून त्याने आरोपी अरविंदसोबत मिळून खंडणीसाठी युगचे अपहरण करण्याचा कट रचला. १ सप्टेंबर २०१४ रोजी आरोपींनी युगचे अपहरण करून त्याला दुचाकीने कोराडी रोडवरील निर्जण ठिकाणी नेले. त्यानंतर डॉ. चांडक यांना मोहसीन खान नावाने दोनदा फोन करून पहिल्यांदा १० कोटी व दुसऱ्यांदा ५ कोटी रुपये खंडणी मागितली. तेव्हापर्यंत डॉ. चांडक यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात युग हरविल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी चक्रे फिरवली होती. दरम्यान, आरोपींनी घाबरून युगचा निर्घृण खून केला.

निर्णयावर समाधानी नाहीसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर समाधानी नाही. आरोपींना फाशीची शिक्षा होण्याची अपेक्षा होती. यासाठी पुढे काय करायचे यावर वकिलांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे.- डॉ. मुकेश चांडक, युगचे वडील. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMurderखूनCapital Punishmentमृत्यूदंडLife Imprisonmentजन्मठेप