युवकांनो कुशल उद्योजक बना - फुके
By Admin | Updated: August 15, 2014 00:43 IST2014-08-15T00:43:05+5:302014-08-15T00:43:05+5:30
युवकांनी कुशल उद्योजक होऊन देशाची युवाशक्ती बनून परिवर्तन घडवावे. नोकरीच्या शोधात न फिरता स्वयंरोजगाराकडे वळून स्वयंनिर्भर व्हावे, असे आवाहन जनसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक

युवकांनो कुशल उद्योजक बना - फुके
स्वयंरोजगार शिबिर : जनसंग्राम व सिद्घिविनायक ग्रूपचा उपक्रम
नागपूर : युवकांनी कुशल उद्योजक होऊन देशाची युवाशक्ती बनून परिवर्तन घडवावे. नोकरीच्या शोधात न फिरता स्वयंरोजगाराकडे वळून स्वयंनिर्भर व्हावे, असे आवाहन जनसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक डॉ. परिणय फुके यांनी केले. जनसंग्राम फाऊंडेशन व सिद्घिविनायक ग्रुप, अमरावतीतर्फे विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, कोराडी रोड येथे दोन दिवसीय स्वयंरोजगार व उद्योजक विकास शिबिर आयोजित करण्यात आले. दोन दिवसीय शिबिरात हजारोच्या संख्येने युवक-युवती व महिला सहभागी झाल्या. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र औद्योगिक फार्मिंग फेडरेशनचे विक्रम बोके, डॉ. शरद निंबाळकर, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश मांजरीकर, गजानन बोंडे, राजीव देशपांडे, सुरेश खोंडे, विकास जैन, प्रफुल्ल काळे, विजय धावटे, एस़ आऱ सूर्यवंशी, सुनील नेरकर, प्रकाश भागवतकार, शेख अब्दुल वहीद, विपन कुमार, टी.व्ही़ रामणमूर्ती, डी.बी़ मेंडके, विजय संजान, ए.बी़ मशानकर, नरेंद्र जिचकार उपस्थित होते़
पहिल्या दिवशी जागतिक बाजारपेठ व भारत दुग्धव्यवसाय प्रक्रिया उद्योग, महिला सबलीकरण व महिलांचा उद्योगात सहभाग व आव्हाने, उद्योगाला लागणारे भांडवल व बँकेचा सहभाग, भारतीय युवकांचा परदेशात औद्योगिक सहभाग, कृषी प्रक्रिया युवकांचा यांत्रिकी सहभाग, व्यवसाय व आरोग्य व्यवस्थापन, ब्युटी पार्लर व स्वयंरोजगार व्यवस्थापन या विषयावर तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी भारतीय बाजारपेठ फळ प्रक्रिया पपई, मोसंबी, ज्यूस, टुटीफ्रूटी, चेरी, जाम जेली आदींचे बाजारपेठ तंत्रज्ञान कौशल्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले़ शेवटी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. शोएब अली मीर साहेब, संचालक, केंद्रीय सेन्सर बोर्ड, उद्धवराव गाडेकर (महाराज) प्रचारक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा आश्रम, पाटसूल, सुरेशराव खोंडे, डॉ. लक्ष्मीकांत कलंत्री, विजय संतान, डी.बी़ मेंडके, गजानन वाघ, राजीव देशपांडे, बाबूराव जीभकाटे, नरेंद्र जिचकार, राजीव गायकवाड, प्रवीण ठावरे आदी उपस्थित होते़सूत्रसंचालन सचिन डोये, प्रास्ताविक अतुल घुईखेडकर यांनी केले. आभार अनंत जगनित यांनी मानले़. नितीन फुके, आशिष मनकवडे, शेखर मनकवडे, मंगेश तागडे, चंचल निमसडे, अभिलाष धानोरकर, घनश्याम अजागिया आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)