शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नागपुरातील गिट्टीखदानमध्ये तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 7:56 PM

दारूच्या अड्डयावर क्षुल्लक कारणावरून गिट्टीखदानमधील गुंडांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केली. राहुल विठ्ठल सलामे (वय ३०) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात थरार निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात प्रफुल्ल ऊर्फ दद्या भीमराव गजभिये (वय २१), आशिष सुनील सोमकुवर (वय २१) आणि रोहित राजू मरकाम (वय २०, तिघेही रा. हजारी पहाड, गिट्टीखदान) या तिघांना अटक केली. तर, त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. 

ठळक मुद्देहजारी पहाडमध्ये थरार : कुख्यात गुंड दद्दयासह तिघांना अटक 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारूच्या अड्डयावर क्षुल्लक कारणावरून गिट्टीखदानमधील गुंडांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केली. राहुल विठ्ठल सलामे (वय ३०) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात थरार निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात प्रफुल्ल ऊर्फ दद्या भीमराव गजभिये (वय २१), आशिष सुनील सोमकुवर (वय २१) आणि रोहित राजू मरकाम (वय २०, तिघेही रा. हजारी पहाड, गिट्टीखदान) या तिघांना अटक केली. तर, त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले.  मृत राहुल गुन्हेगारी वृत्तीचा होता. त्याच्याविरुद्ध हत्या, हाणामारी तसेच लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्याने अलिकडे गुन्हेगारीपासून फारकत घेतली होती. तो मोलमजुरी करून पत्नी पूजा तसेच मोहन (वय ८ वर्षे) आणि आयुष (वय ६ वर्षे) सह हजारी पहाड परिसरात राहत होता. नेहमीप्रमाणे दिवसभराचे काम आटोपून राहुल सायंकाळी घरी आला आणि काही वेळेनंतर बाहेर गेला. त्याला दारूचे व्यसन आहे. हजारीपहाड मध्ये एका अवैध दारूच्या गुत्त्यावर राहुल गेला. मतमोजणीचा दिवस असल्याने सर्वत्र दारूबंदी होती. त्यामुळे हजारीपहाडमधील दारूच्या अवैध गुत्यावर मोठी गर्दी होती. पल्लीच्या दारूच्या अड्ड्यावर कुख्यात गुंड दद्दया, आशिष, रोहित आणि त्याचे साथीदार होते. राहुलचे त्यांच्यासोबत जुने वैमनस्य आहे. राहुल दारूच्या अड्ड्यावर गेल्यानंतर त्यांची एकमेकांवर नजर पडताच दद्दया आणि त्याच्या साथीदाराने त्याला धक्का मारला. राहुलने एकाच्या कानशिलात लगावली. त्यामुळे वाद वाढला. दद्दया आणि त्याच्या साथीदारांनी राहुलला बाजूला ओढत नेले आणिं शस्त्राचे घाव  घातल्यानंतर त्याला दगडाने ठेचून रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. 

कुणीच धावले नाही मदतीलायावेळी दारूच्या अड्ड्यावर मोठी गर्दी होती. बाजूच्या रस्त्यावरही वर्दळ होती. मात्र, आरोपींची गुन्हेगारी वृत्ती बघता कुणीच राहुलच्या मदतीला धावले नाही. एकाने ही माहिती राहुलची पत्नी पूजा हिला दिली. पूजाने घटनास्थळी धाव घेतली तेव्हा राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. तिने लगेच पोलिसांना कळविले. राहुलला मेयोत नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, पूजा सलामेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. रात्रभर धावपळ करून पोलिसांनी एका अल्पवयीन साथीदारासह दद्दया, आशिष आणि रोहितला ताब्यात घेतले.

पल्ल्याच्या भूमिकेची चौकशी  या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या हत्याकांडाचा सूत्रधार दद्या कुख्यात गुंड असून, त्याच्यावर यापूर्वीही हत्या, हत्येचा प्रयत्न, लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. तो आणि अवैध दारूचा अड्डा चालविणारा पल्ल्या या दोघांचेही राहुलसोबत पटत नव्हते. त्यामुळेच त्यांनी राहुलचा काटा काढल्याची चर्चा आहे. या प्रकरणात पल्ल्याची काय भूमिका आहे, त्याचीही पोलीस चौकशी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून