शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

पैशांच्या वादातून युवकाचा खून; १५ दिवसात हत्येच्या सहा घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 13:10 IST

तहसीलच्या भारतमाता चौकातील थरार

नागपूर : दारू पिल्यानंतर पैशाच्या वादातून झालेल्या एका युवकाने आपल्या साथीदाराचा खून केला. ही घटना रविवारी रात्री तहसील पोलिस ठाण्यांतर्गत भारतमाता चौकातील देवधर मोहल्ल्यात घडली.

बबलू सत्राळकर (२०) असे आरोपीचे नाव आहे. तर विजू (३०) असे मृत युवकाचे नाव आहे. बबलू आणि विजू खड्डे गोळा करण्याचे काम करतात. त्यांना दारूचे व्यसन आहे. परिसरात दारूचे दुकान आणि त्यामागे खड्ड्यांचे दुकान आहे. दोघेही दारू पिण्यासाठी आणि खड्डे विकण्यासाठी भंगार व्यावसायिकाकडे येतात. रविवारी रात्री ८ वाजता दोघेही देवधर मोहल्ल्यात आले. दारू पिल्यानंतर ते भंगार व्यावसायिकाच्या दुकानासमोर बसले होते. दरम्यान त्यांच्यात पैशावरून वाद निर्माण झाला. बबलूने विजूवर हल्ला केला. विजूला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच झोन ३ चे उपायुक्त गोरख भामरे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बबलूला ताब्यात घेतले आहे. नागरिकांनी पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे खून झाल्याचे सांगितले. परिसरात दारूच्या दुकानासह सावजी भोजनालय आहे. यामुळे नेहमीच येथे मद्यपी आणि असामाजिक तत्त्वांची गर्दी असते. त्यामुळे परिसरातील नागरिकही त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी तहसील पोलिसांना तक्रार करताच सावजी हॉटेल संचालकाला माहिती होते. त्यानंतर सावजी हॉटेलचालकांचे तक्रार करणाऱ्या नागरिकांशी वैमनस्य होते. पोलिसांनी सावजी हॉटेल चालकांविरुद्ध अभियान सुरू केल्यानंतरही खुनाची घटना घडली आहे. गेल्या १५ दिवसात सहा खुनाच्या घटना घडल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत तहसील पोलिस गुन्हा दाखल करून तपास करीत होते.

पतंगाच्या वादातून जीवघेणा हल्ला

पाचपावलीच्या लष्करीबागमध्ये पतंगाच्या वादातून दोन गटांनी एकमेकांवर शस्त्र चालविले. या घटनेत एक युवक गंभीर जखमी झाला. रात्री ८.३० वाजता दोन्ही गट एकमेकांसमोर आले. त्यांनी धारदार शस्त्राने वार करून एका युवकाला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी परिसरात खुनाची घटना झाल्यामुळे नागरिक दहशतीत आहेत. जखमीवर रात्री उशिरापर्यंत मेयो रुग्णालयात उपचार सुरू होते. पाचपावली पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर