शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘गुगलबाबा’च क्रॅश’झाल्याने तरुणाई ‘हँग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 23:03 IST

Google site crashed ‘वर्क फ्रॉम होम’च्या काळात ‘जी-मेल’, ‘जी-ड्राईव्ह’, ‘यूट्युब’ यांच्याशिवाय कामाचा लोक विचारदेखील करू शकत नाही. तरुणाई तर यांच्याशिवाय राहण्याचा विचारदेखील करू शकत नाही. मात्र सोमवारी सायंकाळी ‘गुगल’च्या अनेक सेवा ‘क्रॅश’ झाल्या अन् जगातील इतरांप्रमाणे नागपुरातील ‘नेटीझन्स’च्या तोंडचे पाणीच पळाले.

ठळक मुद्देउपराजधानीतदेखील फटका : ‘वर्क फ्रॉम होम’वाल्यांची पंचाईत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘वर्क फ्रॉम होम’च्या काळात ‘जी-मेल’, ‘जी-ड्राईव्ह’, ‘यूट्युब’ यांच्याशिवाय कामाचा लोक विचारदेखील करू शकत नाही. तरुणाई तर यांच्याशिवाय राहण्याचा विचारदेखील करू शकत नाही. मात्र सोमवारी सायंकाळी ‘गुगल’च्या अनेक सेवा ‘क्रॅश’ झाल्या अन् जगातील इतरांप्रमाणे नागपुरातील ‘नेटीझन्स’च्या तोंडचे पाणीच पळाले. नेमके काय होत आहे याचा उलगडा अगदी तंत्रज्ञांनादेखील होत नव्हता. अर्ध्या तासानंतर सेवा बऱ्यापैकी पूर्ववत झाल्या. मात्र अनेकांना ते ‘गुगल’वर किती विसंबून आहेत याची जाण निश्चितपणे झाली.

‘कोरोना’चा संसर्ग अद्यापही कायम असल्यामुळे नागपुरात अनेक जण घरूनच काम करीत आहेत. घरून काम करीत असताना ‘गुगल’च्या विविध ‘सर्व्हिसेस’चा प्रचंड वापर होत आहे. अगदी बैठकांपासून ते मुलांचे शिक्षण ‘गुगल’च्या माध्यमातून होत आहे. सायंकाळच्या वेळी अनेक जण काम संपविण्याच्या गडबडीत होते. तर अनेक ‘कोचिंग सेंटर्स’चे ‘जी-मिट’वर ‘लाईव्ह क्लासेस’देखील होते. मात्र ५.२५ नंतर अनेक सेवा सुरूच होत नव्हत्या. अगदी ‘जी-मेल’देखील सुरू नव्हते. त्यामुळे अनेकांनी चक्क ‘गुगल’वरच नेमकी समस्या शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथेदेखील काहीच येत नव्हते. अखेर ३५ मिनिटानंतर बहुतांश सेवा पूर्ववत झाल्या अन् एका मोठ्या दिव्यातून सुटल्याची भावना नेटकऱ्यांमध्ये होती.

‘गुगल’लाच ‘कोरोना’ झाला का जी ?

अर्ध्या तासाच्या कालावधीत ‘गुगल’व्यतिरिक्त इतर ‘प्लॅटफॉर्म’वर अक्षरश: प्रश्नांचा भडीमार झाला. अनेकांनी तर भन्नाट कल्पना लढवत एकाहून एक तर्क देण्यास सुरुवात केली. ‘गुगल’लाच ‘कोरोना’ झाला का, असा सवालच एकाने उपस्थित केला. याशिवाय ‘सोशल मीडिया’वर विविध ‘मीम्स’चा तर रात्रीपर्यंत वर्षाव सुरू होता.

टॅग्स :googleगुगलnagpurनागपूर