शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या तरुणाने केली नागपूर रेल्वेस्थानकावर एकाची हत्या

By नरेश डोंगरे | Updated: June 9, 2023 13:52 IST

सीसीटीव्हीवरूनच पोलिसांनी आरोपीचा माग काढला

नागपूर : किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर पुण्यातील एका आरोपीने छत्तीसगडमधील तरुणाच्या डोक्यात सिमेंटची फळी घालून त्याची हत्या केली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. जीतेंद्र उर्फ टोपी (रा. छत्तीसगड) असे मृताचे नाव आहे. तर, आरोपीचे नाव दिनसागर उर्फ दिनेश धोंडिबा सदाफुले (वय ३४) असून तो पुण्यातील वारजे माळवाडी, रामनगर येथील रहिवासी आहे.

हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रेल्वे पोलिसांचे पथक येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक ४-५ वर गस्त करीत असताना त्यांना एका तरुणाच मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. मृताच्या डोक्यावर दगडाने ठेचल्याचे दिसून येत असल्याने पोलिसांनी लगेच वरिष्ठांना ही माहिती कळविली. त्यानंतर घटना समजून घेण्यासाठी फलाटावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.

आरोपी तरुण मृतकाला सिमेंटच्या फळीने ठेचत असल्याचे दिसून आले. सीसीटीव्हीवरूनच पोलिसांनी आरोपीचा माग काढला असता तो ईटारसी लाईनच्या टोकावर फलाटाच्या आडोशाला दडून दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने हत्येची कबुली दिली. त्याने आपले नाव आणि पत्ता सांगून किरकोळ वादातून हत्या केल्याचे सांगितले. दरम्यान, मृतकाचे पूर्ण नाव काय, तो काय करीत होता. हत्येचे नेमके कारण कोणते, या संबंधीचा सविस्तर खुलासा वृत्त लिहिस्तोवर झाला नव्हता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर