‘यूथ एम्पॉवरमेंट समिट’ देणार विकासाचा मार्ग

By Admin | Updated: January 26, 2015 00:54 IST2015-01-26T00:54:17+5:302015-01-26T00:54:17+5:30

विदर्भातील युवा पिढीला योग्य प्रकारची नोकरी अथवा स्वत:च्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टीने स्वयंरोजगार मिळणे अत्यंत आवश्यक असून उद्यमशील तरुणाई व समृद्ध विदर्भ

'Youth Empowerment Summit' will give way for development | ‘यूथ एम्पॉवरमेंट समिट’ देणार विकासाचा मार्ग

‘यूथ एम्पॉवरमेंट समिट’ देणार विकासाचा मार्ग

विदर्भ फॉर्च्युन फाऊंडेशनचा पुढाकार
नागपूर : विदर्भातील युवा पिढीला योग्य प्रकारची नोकरी अथवा स्वत:च्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टीने स्वयंरोजगार मिळणे अत्यंत आवश्यक असून उद्यमशील तरुणाई व समृद्ध विदर्भ घडविण्याया संकल्प विदर्भ फॉर्च्युन फाऊंडेशनने घेतला आहे. या संकल्पांतर्गत नागपुरात ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’चे आयोजन करण्यात आले आहे.
नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, मिहान- नॅशनल रुलर लाईव्हलीहूड मिशन, नेहरू युवा केंद्र, नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिश यांच्या विशेष सहकार्याने मानकापूर स्पोर्ट्स स्टेडियम परिसर कोराडी रोड येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या समिटची जय्यत तयारी सध्या सुरु आहे.
तीन दिवस चालणाऱ्या भरगच्च कार्यक्रमात उद्बोधक विचारांचे चित्रप्रदर्शन, उद्योगधंद्यात स्वकर्तृत्वाने यशस्वी झालेल्या मान्यवरांची उद्बोधक भाषणे, मुलाखती, परिसंवाद, स्लाईड शो, विविध उद्योगांचे प्रशिक्षण, उद्यमशीलतेला पोषक ठरतील, असे मार्गदर्शन करणारे सरकारी व स्वयंसेवी संस्थांचे स्टॉल असे आकर्षक स्वरूप असणार आहे. जवळपास १५० स्टॉल उभारण्यात येणार असून यात विविध शासकीय योजनांची माहितीसुद्धा राहणार आहे.
यासोबतच एक हजारांहून अधिक स्वयंरोजगार व्यवसायांची तपशीलवार माहिती मिळेल. महिलांना घरच्या घरी सहज करता येईल, असे शेकडो कुटीरउद्योग कोणते, याबाबत माहिती, बचत गटातील महिलांना त्यांच्या उत्पादनासाठी शेकडो कुटीरउद्योगांची माहिती, व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा, विविध प्रकारची मशीनरी व कच्चा माल कुठे मिळेल, उद्योजकांना व्यवसाय करण्यासाठी कोणकोणत्या संस्था कशा प्रकारे अर्थसाहाय्य करतात.
देशभरात नोकऱ्या कुठे उपलब्ध आहेत. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे र्रिक्रुटमेंट बोर्ड, बँक, पोलीस भरती, भूमी अखिलेख भरती आदी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, याबाबतचे नामवंत तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सुद्धा या समिटमध्ये होणार आहे. (प्रतिनिधी)
उद्यमशील स्वप्नांच्या पंखांना मिळणार बळ
विदर्भातील तरुणांसाठी विशेषत: प्रत्येक घटकांतील हातांना योग्य काम देऊन त्यांना सकारात्मक दिशा देण्याच्या दृष्टीने ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’चे आयोजन करण्यात आले आहे. स्वयंरोजगार व नोकऱ्यांच्या संबंधात कार्यरत असलेल्या शंभराहून अधिक सरकारी व स्वयंसेवी संस्थांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्या विचारमंथनातून निर्माण होणारे नवनीत हे तरुणाईला आत्मविश्वास व विकासाच्या उन्नतीचे बोधामृत ठरणार आहे. या समिटच्या माध्यमातून विदर्भातील तरुणांच्या उद्यमशील स्वप्नांच्या पंखांना बळ देणारी एक अभिनव लोक चळवळ सुरू असून नागरिकांनी विशेषत: विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
आ. प्रा. अनिल सोले
अध्यक्ष - विदर्भ फॉर्च्युन फाऊंडेशन

Web Title: 'Youth Empowerment Summit' will give way for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.