शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

गणेश विसर्जन करताना तरुण वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 23:03 IST

मित्र व इतरांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत चौघे गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी खोल पाण्यात घेऊन गेले. त्यातच चौघेही मूर्तीसोबत प्रवाहात आले आणि वाहू लागले. त्यात तिघे कसेबसे बचावले. मात्र, एक जण कन्हान नदीच्या प्रवाहात वाहून गेला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिना संगम (ता. कामठी) येथे सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील बिना संगम येथील घटना : बाप्पांची मूर्ती घेऊन चौघे गेले खोल पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मित्र व इतरांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत चौघे गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी खोल पाण्यात घेऊन गेले. त्यातच चौघेही मूर्तीसोबत प्रवाहात आले आणि वाहू लागले. त्यात तिघे कसेबसे बचावले. मात्र, एक जण कन्हान नदीच्या प्रवाहात वाहून गेला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिना संगम (ता. कामठी) येथे सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.विक्की ज्ञानेश्वर इंगोले (२७, रा. विनोबा भावे नगर, नागपूर) असे वाहून गेलेल्या तर श्याम धकाते (२८), भारत डोरलीकर (२८) व राजन आष्टनकर (२९) सर्व रा. विनोबा भावेनगर, नागपूर अशी थोडक्यात बचावलेल्या तरुणांची नावे आहेत. चौघेही नागपूर येथील विनोबा भावे नगरातील नागोबा गणेश उत्सव मंडळाचे सदस्य आहेत. ते सोमवारी सायंकाळी बिना संगम येथे गणपती विसर्जनासाठी दोन ट्रॅक्टरने आले होते. त्यांच्यासोबत अंदाजे ५० ते ६० महिला, पुरुष व मुले होते.दरम्यान, ढगाळ वातावरण व विजांच्या कडकडाटामुळे पावसाळी वातावरण तयार झाले होते. त्यातच चौघेही गणपतीची सहा फूट उंच मूर्ती घेऊन कन्हान नदीच्या पात्रात विसर्जनासाठी उतरले. दुथडी भरून वाहणारी कन्हान नदी व पाण्याचा प्रवाह बघता अनेकांनी त्यांना खोल पाण्यात न जाण्याची वारंवार सूचना केली. परंतु, त्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत चौघेही मूर्ती घेऊन आत गेले आणि प्रवाहात सापडले.पाण्याच्या तेज प्रवाहामुळे संतुलन बिघडले व चौघेही मूर्तीसोबत गटांगळ्या खाऊ लागले. त्यातच भारतने एका हाताने राजनचे तर दुसऱ्या हाताने विक्कीचे केस पकडून त्यांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न चालविला. परंतु, विक्की त्याच्या हातून निसटला. त्यातच श्यामने विक्कीला पकडण्याचा प्रयत्न कलो. पण, त्यालाही यश आले नाही. परिणामी, तिघेही पाण्याबाहेर आले आणि विक्की प्रवाहात वाहून गेला.विक्की हा नागपूर येथील एका बॅण्डमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्याच्यापश्चात आई, वडील, पत्नी व ११ महिन्याचा मुलगा आहे. मंगळवारी दिवसभर बिना संगम येथे नदीच्या काठावर विक्कीचे कुटुंबीय, नातेवाई व नागरिकांची गर्दी होती.शोधकार्य सुरूमाहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, तहसीलदार बाळासाहेब टेळे, खापरखेड्याचे ठाणेदार अशोक साखरकर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लगेच पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांच्या नेतृत्वात सहा जणांच्या मदतीने ‘रोबोराईज बोट’द्वारे विक्कीचा शोध सुरू केला. मात्र, वृत्त लिहिस्तो त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. शोधकार्य मंगळवार सायंकाळपर्यत सुरूच होते.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनDeathमृत्यू