‘युवा कनेक्ट’ तरुणांना देणार जीवनाचा मार्ग
By Admin | Updated: August 6, 2014 01:14 IST2014-08-06T01:14:46+5:302014-08-06T01:14:46+5:30
आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण तरुणांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, केंद्र प्रशिक्षण व वाचनालयाची अतिशय समस्या आहे. आर्थिक परिस्थिती व स्थानिक अपुऱ्या सुविधांमुळे पात्रता असूनही

‘युवा कनेक्ट’ तरुणांना देणार जीवनाचा मार्ग
अमोल देशमुख : हर्ड फाऊंडेशनतर्फे काटोल येथे युवक मेळावा
काटोल : आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण तरुणांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, केंद्र प्रशिक्षण व वाचनालयाची अतिशय समस्या आहे. आर्थिक परिस्थिती व स्थानिक अपुऱ्या सुविधांमुळे पात्रता असूनही त्यांची संधी गमावल्या जात आहे. यासाठी हर्ड फाऊंडेशनच्या माध्यमाने ‘युवा कनेक्ट’ मोहीम जिल्हाभर प्रभावीपणे कार्य करणार असल्याचे मत संस्थेचे संचालक युवा नेते डॉ. अमोल देशमुख यांनी व्यक्त केले.
काटोल येथील अरविंद देशमुख सभागृह येथे युवक मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले. प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी रिसर्च अॅण्ड मेडिकल एज्युकेशन टेक्नॉलाजीचे संचालक डॉ. सुरेश बारी, मायक्रोबॉयलॉजीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. कल्पना दाते यांनी तरुणांना मार्गदर्शन केले.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी व्हीएसव्हीएमचे पालक संचालक चंद्रशेखर देशमुख, संचालक दिलीप हिवरकर, योगेश गोतमारे, संगीता लोहे, चंद्रशेखर राऊत, गोपाल मडके, सचिन सांभारे, अर्जुन ढेंगरे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन उमेश ढोके यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)