शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात युवक काँग्रेसचा एल्गार! मल्लिकार्जुन खर्गेंच्या अपमानावरून हिमांता बिस्वा सरमांविरुद्ध 'जोडे मारो' आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:53 IST

Nagpur : आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ बहुजन नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटत आहेत.

नागपूर : आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ बहुजन नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटत आहेत. या विधानाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि नागपूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज देवडिया काँग्रेस भवन येथे 'उग्र' आंदोलन करण्यात आले.

​आक्रमक घोषणांनी परिसर दणाणला

दलितांचा अपमान करणाऱ्यांचा निषेध असो, "भाजपचा मनुवाद हद्दपार करा" आणि संविधानावर हल्ला सहन करणार नाही अशा आक्रमक घोषणा देत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परिसर डोक्यावर घेतला होता. संतप्त कार्यकर्त्यांनी सरमा यांच्या प्रतिमेला जोडे मारले आणि त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न करून आपला तीव्र रोष व्यक्त केला.

​पोलिसांची धरपकड, तरीही कार्यकर्त्यांचा निर्धार कायम

​आंदोलना दरम्यान परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, पोलिसांच्या या कारवाईमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह कमी न होता रोष अधिकच वाढलेला पाहायला मिळाला. युवक काँग्रेसने स्पष्ट इशारा दिला आहे की, हा केवळ राजकीय विरोध नसून  बहुजन समाजाच्या अस्मितेचा लढा आहे.

नेतृत्वाचा घणाघात

​या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय युवक काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्राचे सह-प्रभारी नवज्योत सिंग संधू यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, "हिमांता बिस्वा सरमा यांचे वक्तव्य हे त्यांच्या विकृत आणि अहंकारी मानसिकतेचे प्रतीक आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्यासाठी भाजप जाणीवपूर्वक बहुजन समाजाचा आणि ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करत आहे. अशा प्रवृत्तींना रस्तावर उतरून चोख प्रत्युत्तर दिले जाईल.

​लोकशाहीचा गळा घोटण्याचे कारस्थान?

​युवक काँग्रेसने यावेळी काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांच्यावर झालेल्या कारवाईचाही तीव्र निषेध केला. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे, हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे, असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.

यांची होती प्रमुख उपस्थिती

​आंदोलनात नागपूर झोन इन्चार्ज कपिल ढोके, उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, अनुराग भोयर, नागपूर प्रभारी रितेश पांडव, महासचिव अक्षय हेटे यांच्यासहमोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. येणाऱ्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र आणि व्यापक केले जाईल, असा निर्णायक इशारा यावेळी युवक काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Youth Congress Protests Against Himanta Biswa Sarma's Remarks

Web Summary : Nagpur Youth Congress protested against Assam CM Sarma's remarks about Kharge, burning effigies and raising slogans. Police detained activists during the intense demonstration. Leaders condemned Sarma's statement as an insult to the Bahujan community and democracy, vowing further action.
टॅग्स :nagpurनागपूरcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे