युवक काँग्रेसची मनपावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:09 IST2021-07-29T04:09:35+5:302021-07-29T04:09:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपा प्रशासनाकडून शहरात लावण्यात आलेल्या अनधिकृत बॅनरवर कारवाई करताना पक्षपात केला जातो. काँग्रेस ...

Youth Congress strikes at Manpa | युवक काँग्रेसची मनपावर धडक

युवक काँग्रेसची मनपावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपा प्रशासनाकडून शहरात लावण्यात आलेल्या अनधिकृत बॅनरवर कारवाई करताना पक्षपात केला जातो. काँग्रेस पक्षाचे बॅनर हटविण्यात आले; परंतु भाजपने लावलेल्या बॅनर विरोधात कोणतीही कारवाई केली जात नसल्याने बुधवारी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मनपा मुख्यालयावर धडकले.

युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मुख्यालयात पोहोचताच कार्यालयाचे दरवाजे बंद करण्यात आले. पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध प्रशासनाविरोधात जोरदार नारेबाजी केली.

आंदोलनात युवक काँग्रेसचे तन्वीर विद्रोही, अक्षय हेटे, सुशांत लोखंडे, वसीम खान, रौनक चौधरी, सुहास नानवटकर, फझलूर कुरेशी, राहुल अभंग, प्रफुल भाजे, निखिल टोंग, शत्रू चंदेल, शुभम तेलंग, अनिकेत खोरे, सुजल श्रीखंडे, अलोक मांगे, कुणाल चौधरी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Youth Congress strikes at Manpa