अवनी वाघिणीला ठार करण्याच्या निषेधार्थ नागपुरात युवा काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 15:19 IST2018-11-05T15:17:47+5:302018-11-05T15:19:06+5:30
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार केल्याच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी २ वाजता नागपुरात युवा काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली.

अवनी वाघिणीला ठार करण्याच्या निषेधार्थ नागपुरात युवा काँग्रेसची निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: यवतमाळ जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार केल्याच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी २ वाजता नागपुरात युवा काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली.
तिला ठार करणाऱ्या असगर अली या शिकाऱ्याजवळ शिकारीचा परवाना नसल्याचे व रात्रीच्या वेळी शिकार करण्यास मनाई असल्याकडे या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. असगर अलीच्या वडिलांकडे शिकारीचा परवाना आहे मात्र तो असगरजवळ नाही, असा या मंडळीचा दावा होता.
या वाघिणीला बेशुद्ध का केले नाही असा सवाल करीत, युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या दुटप्पी धोरणांचा निषेध केला. त्यांनी टायगर कॅपिटलच्या पुतळ््याखाली घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी सरकारच्या पशूप्रेमाविषयी व वाघांच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली. नागपूर युवा काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल पुरी, आनंद तिवारी, महेश बालपांडे, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.