शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भागवत यांच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:12 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सैन्याबद्दल केलेल्या कथित वक्तव्याचा युवक काँग्रेसने बुधवारी निषेध केला. निषेध मोर्चा काढून विरोधात नारेबाजी केली. या प्रकरणी पोलिसांनी युवक काँग्रेसच्या ६४ पदाधिकाऱ्यांना अटक केली.

ठळक मुद्देनिषेध मोर्चा काढला : ६४ कार्यकर्त्यांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क   नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सैन्याबद्दल केलेल्या कथित वक्तव्याचा युवक काँग्रेसने बुधवारी निषेध केला. निषेध मोर्चा काढून विरोधात नारेबाजी केली. या प्रकरणी पोलिसांनी युवक काँग्रेसच्या ६४ पदाधिकाऱ्यांना अटक केली.युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रतिभा रघुवंशी व प्रदेश प्रभारी अमित यादव यांच्या उपस्थितीत चितारओळीतील गांधी पुतळ्यापासून निषेध मार्च काढण्यात आला. यापूर्वी संघाच्या रेशीमबाग येथील केशवद्वार पासून दुचाकी रॅली काढण्यात आली. ही रॅली राम कूलर चौक, गांधीगेट, अग्रसेन चौक मार्गे चितारओळीत पोहचली. येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर रॅली कल्याणेश्वर मंदिर मार्गाने संघ मुख्यालयाकडे निघाली. यावेळी तहसील पोलिसांनी रॅलीला रोखले व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलकांमध्ये सुशांत सहारे, नवेद शेख, अखिलेश राजन, आसिफ अन्सारी, स्वप्निल ढोके, जावेद शेख, अक्षय घाटोळे, बाबू खान, अक्षय हेटे, इमरान पला, अलोक कोंडापूरवार, मुज्जू शेख, विशाल वाघमारे, फजलूर कुरैशी, नागेश जुनघरे, सागर चव्हाण, हेमंत कातुरे, राकेश बैरीसाल, हर्षल हजारे, फरदीन खान, सुबोध सवाईतुल, मनोज हसोरिया, गुड्डु भाई, पूजक मदने, अभिजित पवार, नितीन गुरव, मनोज धकाते आदींचा समावेश होता. यावेळी, भागवत हे सैन्याची व देशाची माफी मागत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.संविधान चौकातही आंदोलन रामटेक लोकसभा युवक काँग्रेसतर्फे अध्यक्ष अनिल राय यांच्या नेतृत्वात संविधान चौकात कार्यकर्त्यांनी मुंडण करून मोहन भागवत यांचा निषेध केला. यावेळी राष्ट्रीय सचिव प्रतिभा रघुवंशी, अमित यादव, कुणाल राऊत, कमलेश चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांसोबत पोलिसांचा वाद होऊन धक्काबुक्कीही झाली. पोलिसांनी राय यांच्यासह १२ पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. आंदोलनात तनवीर अहमद विद्रोही, अजित सिंह, अंदाज वाघमारे, नीरज लोणारे, धीरज पांडे, राकेश निकोसे, दिनेश यादव, परसराम मानवटकर, अमीर नूरी, अभिषेक सिंह, वैष्णवी भारद्वाज, सचिन किरपान, शशिकांत थोटे, अश्विन बैस, विष्णू कोकडे, आशिष मंडपे, सतीश पाली, रितेश काडे, अभिजित ठाकरे, सम्राट गजभिये, धीरज यादव, फिरोज अन्सारी, संदीप यादव, विजय कोंडुलवार, ललित वैरागडे, प्रशांत दशमवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन