तरुण पिढी होऊ शकते न्यायव्यवस्थेची राजदूत : सरन्यायाधीश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 16:02 IST2019-08-18T15:22:46+5:302019-08-18T16:02:20+5:30
तरुण पिढीमध्ये कायदेविषयक जागृती करणे व कायदेविषयक ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करण्याची भावना निर्माण करणे आवश्यक आहे असे मत देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी व्यक्त केले.

तरुण पिढी होऊ शकते न्यायव्यवस्थेची राजदूत : सरन्यायाधीश
ऑनलाईन लोकमत
नागपूर : तरुण पिढी न्यायव्यवस्थेची राजदूत होऊ शकते. त्यामुळे तरुण पिढीमध्ये कायदेविषयक जागृती करणे व कायदेविषयक ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करण्याची भावना निर्माण करणे आवश्यक आहे असे मत देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी व्यक्त केले. राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या अखिल भारतीय संमेलनाचा रविवारी समारोप झाला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
न्यायाची गरज असलेल्या व्यक्तीपर्यंत वेळेवर पोहोचण्यासाठी व त्याला गुणवत्तापूर्ण न्याय मिळण्यासाठी विधी सेवेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. मोबाईल ?प व अशा विविध माध्यमातून गरजूंपर्यंत महत्वाची कायदेविषयक माहिती पोहोचवता येऊ शकते. तुम्ही किती लोकांना विधी सेवा दिली हे महत्वाचे नाही. महत्व गुणवत्तापूर्ण सेवेला आहे. त्यामुळे विधी सेवेसाठी विधिज्ञाची निवड करताना कडक प्रक्रिया ठेवली पाहिजे.माणसे कायद्यासाठी नसून कायदे माणसांसाठी आहेत. ते कायद्याचा भंग झाल्यास न्यायालयात दाद मागू शकतात असे न्या. गोगोई यांनी पुढे बोलताना सांगितले.