मारहाणीत धाकटा भाऊ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:09 IST2021-03-31T04:09:01+5:302021-03-31T04:09:01+5:30
बुटीबाेरी : धाकट्याने थाेरल्या भावाकडे २० रुपये मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून भावांमध्ये जुंपली. अशात थाेरल्याने पैसे न देता काठीने मारहाण ...

मारहाणीत धाकटा भाऊ जखमी
बुटीबाेरी : धाकट्याने थाेरल्या भावाकडे २० रुपये मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून भावांमध्ये जुंपली. अशात थाेरल्याने पैसे न देता काठीने मारहाण करीत धाकट्यास जखमी केले. दरम्यान, पाेलिसांनी थाेरल्या भावाविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे. ही घटना एमआयडीसी बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील विक्तुबाबा देवस्थानजवळ टाकळघाट येथे शनिवारी (दि. २७) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
देवानंद हरिश्चंद्र मेश्राम (३४, रा. विक्तुबाबा देवस्थान टाकळघाट, ता. हिंगणा) असे जखमीचे नाव असून, राजेश हरिश्चंद्र मेश्राम (४०, रा. विक्तुबाबा देवस्थान टाकळघाट) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. जखमी देवानंदने त्याचा थाेरला भाऊ राजेशला २० रुपये मागितले. त्याने पैसे न देता शिवीगाळ केल्यामुळे दाेघांमध्ये वाद झाला. अशात आराेपी राजेशने देवानंदला काठीने मारहाण करीत जखमी केले. या प्रकरणी एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि कलम ३२४ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपीस अटक केली आहे. पुढील तपास सहायक फाैजदार प्रमाेद बन्साेड करीत आहेत.