शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus in Nagpur : आत्महत्येचा प्रयत्न करणारी युवती पॉझिटिव्ह, तीन रुग्णांची नोंद : रुग्णसंख्या ४१०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 00:16 IST

शहरातील तापमानाने शुक्रवारी आपला उच्चांक गाठला असतानाही आरोग्य यंत्रणेला काहिसा दिलासा मिळाला. आज केवळ तीनच रुग्णाची नोंद झाल्याने कामाचा ताण हलका झाला. रुग्णसंख्या ४१० झाली असून १० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. विशेष म्हणजे, गुरुवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न करणारी युवती पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली.

ठळक मुद्देकोरोनामुक्त १०

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तापमानाने शुक्रवारी आपला उच्चांक गाठला असतानाही आरोग्य यंत्रणेला काहिसा दिलासा मिळाला. आज केवळ तीनच रुग्णाची नोंद झाल्याने कामाचा ताण हलका झाला. रुग्णसंख्या ४१० झाली असून १० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. विशेष म्हणजे, गुरुवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न करणारी युवती पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. या युवतीला कोरोनाची लागण कुठून झाली, यावर शंका व्यक्त केली जात आहे. मेयो प्रशासनाला या युवतीवर उपचार करणाऱ्या दोन निवासी डॉक्टर, चार इन्टर्न डॉक्टर व १० परिचारिका असे १६ जणांना क्वारंटाईन केले आहे. विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या बजेरिया येथील २१वर्षीय युवतीला मेयोमध्ये सोमवारी भरती करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू झाले. तातडीच्या उपचारामुळे युवती मृत्यूच्या धोक्यातून बाहेर आली. परंतु तिला ताप व खोकला असल्याने गुरुवारी तिचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. रात्री पॉझिटिव्ह अहवाल येताच मेयो प्रशासन सतर्क झाले. रुग्णाला जेव्हा अतिदक्षता विभागात दाखल केले त्याच विभागात ५६ वर्षीय महिला उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे वॉर्डातच लागण झाली तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. परंतु मेयोच्या वरिष्ठ डॉक्टरांनुसार, मृत महिलेच्या खाटापासून रुग्णाची खाट बरीच लांब होती. शिवाय, युवती रुग्णालयात आल्यापासून तिला लक्षणेही होते. यामुळे तिला बाहेरूनच लागण झाली असावी, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.डॉक्टर, इन्टर्नसह १६ जण क्वारंटाईनआत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवतीचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने खबरदारी म्हणून मेयो प्रशासनाने तिच्यावर उपचार करणाऱ्यांना क्वारंटाईन केले. यात दोन निवासी डॉक्टर, चार इन्टर्न, १० परिचारिका अशा १६ जणांचा समावेश आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या मते, येथील बहुसंख्य डॉक्टर व परिचारिका पीपीई किट घालूनच सेवा देतात. परंतु तरीही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही ते म्हणाले.दोन भावंडासह तीन पॉझिटिव्हएम्समध्ये तपासण्यात आलेल्या नमुन्यात मोमीनपुरा येथील १७ व १८वर्षीय युवकाचा नमुना पॉझिटिव्ह आला. हे दोन्ही भाऊ आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते ‘व्हीएनआयटी’मध्ये दाखल होते. या शिवाय, नीरीच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात मोमीनपुरा येथील २६ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आला. या तिन्ही रुग्णांना लक्षणे नसल्याचे सांगण्यात येते.७३ वर्षीय महिलेने केली कोरोनावर मातगेल्या दहा दिवसापासून मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाºया ७३ वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली. मागील तीन दिवसात ताप व इतर लक्षणे नसल्याने व शरीरातील आॅक्सिजनची पातळी सामान्य असल्याने आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या रुग्णासोबतच मेडिकलने सात रुग्णांना सुटी दिली. यात २०, ३५, ३६, ६० वर्षीय महिला व ६५पुरुष आहे. हे सर्व रुग्ण मोमीनपुरा तकिया येथील रहिवासी आहेत तर एक चंद्रपूर येथील रुग्ण आहे. मेयोमधून मोमीनपुरा येथील ३५ वर्षीय तर सतरंजीपुरा येथील १३ वर्षाचा मुलगा व ४१ वर्षीय पुरुष बरे होऊन घरी परतले.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित ६६दैनिक तपासणी नमुने ४५२दैनिक निगेटिव्ह नमुने ४४२नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ४१०नागपुरातील मृत्यू ०७डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३२२डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २३०९क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १७३३पीडित-४१०-दुरुस्त-३२२-मृत्यू-७

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर