तरुणीवर अत्याचार, आराेपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:07 IST2021-07-08T04:07:57+5:302021-07-08T04:07:57+5:30

वाडी : तरुणीशी सलगी करून मैत्रीचा गैरफायदा घेत आराेपीने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून पाेलिसांनी ...

Young woman tortured, arrested | तरुणीवर अत्याचार, आराेपीस अटक

तरुणीवर अत्याचार, आराेपीस अटक

वाडी : तरुणीशी सलगी करून मैत्रीचा गैरफायदा घेत आराेपीने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे. ही घटना वाडी परिसरात बुधवारी उघडकीस आली.

शुभम करमचंद रामटेके (२०, रा. आंबेडकरनगर, वाडी) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. आराेपीने २०१८ मध्ये पीडित तरुणीशी मैत्री केली. त्यानंतर तिच्याशी सलगी करून बदनामी करण्याची धमकी देत आराेपीने तिच्याशी वारंवार बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केल्याने ती गर्भवती राहिली. दरम्यान, पीडितेने पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी भादंवि कलम ३७६ (२)(एन) ५०६, सहकलम ४,६ पाेक्साे कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीला अटक केली आहे. पाेलिसांनी आराेपीची ९ जुलैपर्यंत पाेलीस काेठडी मिळविली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक चिपडे करीत आहेत.

Web Title: Young woman tortured, arrested