प्राणघातक हल्ल्यात तरुणी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:09 IST2020-12-22T04:09:36+5:302020-12-22T04:09:36+5:30

बुटीबाेरी : लग्नाच्या बाेलणीवरून उद्भवलेला वाद विकाेपास केला आणि त्यातून तरुणाने तरुणीवर प्राणघातक हल्ला चढविला. त्यात ती गंभीर जखमी ...

Young woman injured in deadly attack | प्राणघातक हल्ल्यात तरुणी जखमी

प्राणघातक हल्ल्यात तरुणी जखमी

बुटीबाेरी : लग्नाच्या बाेलणीवरून उद्भवलेला वाद विकाेपास केला आणि त्यातून तरुणाने तरुणीवर प्राणघातक हल्ला चढविला. त्यात ती गंभीर जखमी झाली. ही घटना बुटीबाेरी शहरात रविवारी (दि. २०) रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.

मयूर संजय महाजन, रा. कचगाव, ता. भडगाव (पाचाेरा), जिल्हा जळगाव असे आराेपीचे नाव आहे. ती तरुणी (रा. प्रसाद काॅलनी, बुटीबाेरी) मयूरची मैत्रीण असून, मयूरने तिच्या आईवडिलांसमक्ष तिच्याशी लग्न करण्याचा इच्छा व्यक्त हेती हाेती. त्यांनी मयूरला लग्नाची बाेलणी करण्यासाठी बाेलावण्याची सूचना केली हाेती. परंतु, त्याचे आईवडील बाेलणी करण्यासाठी आले नाहीत. त्यातच मयूरने तिला साेबत चलण्यासाठी हट्ट धरला. तिने नकार देताच मयूरने खिशातून धारदार शस्त्र काढून तिच्या पाेटावर वार केले. यात तिच्या पाेटाला व हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. सध्या तिच्यावर नागपूर येथील हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिने दिलेले बयाण आणि डाॅक्टरांनी दिलेला वैद्यकीय अहवाल याच्या आधारे बुटीबाेरी पाेलिसांनी मयूरविरुद्ध भादंवि ३०७ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक चाैधरी करीत आहेत. वृत्त लिहिस्ताे आराेपीला अटक करण्यात आली नव्हती.

Web Title: Young woman injured in deadly attack