सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:07 IST2021-07-08T04:07:24+5:302021-07-08T04:07:24+5:30

देवलापार : शेतात धान राेवणी करीत असताना विषारी सापाने दंश केल्याने तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना देवलापारनजीकच्या सवंदनी शिवारात ...

Young woman dies of snake bite | सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू

सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू

देवलापार : शेतात धान राेवणी करीत असताना विषारी सापाने दंश केल्याने तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना देवलापारनजीकच्या सवंदनी शिवारात बुधवारी (दि.७) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.

मेहंदी भिकराम सलामे (२०, रा. सवंदनी, ता. रामटेक) असे मृत तरुणीचे नाव आहे. मृत मेहंदी ही कुटुंबीयांसह स्वत:च्या शेतात धान राेवणीसाठी गेली हाेती. अशात दुपारी २.३० वाजताच्या सुमारास धान राेवणी करीत असताना तिला विषारी नागाने दंश केला. तिला त्रास हाेऊ लागल्याने लगेच देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी तिला मृत घाेषित केले. विषारी नागाने मेहंदीच्या पायाच्या नसेवर दंश केल्यामुळे तिच्या शरीरात वेगाने विष पसरल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे जाणकारांनी सांगितले. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास माेरेश्वर नागाेसे करीत आहेत.

Web Title: Young woman dies of snake bite