पुलावरून पडून तरुणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:14 IST2021-05-05T04:14:05+5:302021-05-05T04:14:05+5:30

कन्हान : माेबाईलवर बाेलत असताना तरुणी अचानक पुलाखाली पडली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ...

Young woman dies after falling from bridge | पुलावरून पडून तरुणीचा मृत्यू

पुलावरून पडून तरुणीचा मृत्यू

कन्हान : माेबाईलवर बाेलत असताना तरुणी अचानक पुलाखाली पडली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कन्हान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर महामार्गावरील टेकाडी उड्डाणपूल येथे साेमवारी (दि.३) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

ममता प्रकाश बुराडे (२८, रा. मुन्शी गल्ली गवराबाई मठ महाल, नागपूर) असे मृत तरुणीचे नाव आहे. ममता ही जब्बार माेबीन खान (२३, रा. अरसमबाग गल्ली, नागपूर) यांच्यासाेबत नागपूर येथून येऊन कन्हान परिसरातील टेकाडी उड्डाणपूल येथे बाेलत बसले हाेते. अशात तिला कुणाचा तरी फाेन आल्याने ती दूर जाऊन माेबाईलवर बाेलत हाेती. दरम्यान अचानक ती पुलाखाली पडून जखमी झाली. लगेच तिला प्रथम कन्हान येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात व नंतर मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घाेषित केले. याप्रकरणी जब्बार खान यांच्या तक्रारीवरून कन्हान पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस हवालदार खुशाल रामटेके करीत आहेत.

Web Title: Young woman dies after falling from bridge