प्राणघातक हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:08 IST2021-04-02T04:08:43+5:302021-04-02T04:08:43+5:30

माैदा : रंग लावण्याच्या वादातून दाेघांनी प्राणघातक हल्ला करीत तरुणास गंभीर जखमी केले. दरम्यान, पाेलिसांनी आराेपींविरुद्ध गुन्हा नाेंदवून एकास ...

Young seriously injured in fatal attack | प्राणघातक हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

प्राणघातक हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

माैदा : रंग लावण्याच्या वादातून दाेघांनी प्राणघातक हल्ला करीत तरुणास गंभीर जखमी केले. दरम्यान, पाेलिसांनी आराेपींविरुद्ध गुन्हा नाेंदवून एकास अटक केली आहे. ही घटना अराेली (ता. माैदा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तुमान येथे बुधवारी (दि.३१) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

सरताज ताराचंद रंधई (२४, रा. तुमान, ता. माैदा) असे जखमीचे नाव असून, मिथुन राजकुमार चाैरे (३०, रा. बागडीपार शांतिनगर, नागपूर) व आकाश जयदेव झडावणे (२४, रा. तुमान), अशी आराेपींची नावे आहेत. सरताज रंधई हा जेवणाचा डबा घेऊन निमखेडा येथे गहू भरण्यासाठी मजुरीने जात हाेता. अशात गावातील शाळेसमाेर दाेन्ही आराेपी तेथे आले व सरताजला ‘आकाशच्या पत्नीला गुलाल रंग लावला का?’ असे विचारले. यावर सरताजने ‘मी तिला रंग लावला नाही’ असे म्हणताच आराेपींनी त्याच्या पाेटावर चाकूने वार करीत त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर सरताजने घाबरून आराेपी मिथुनला धक्का देत स्वत:ला साेडविले आणि बचावासाठी आकाशला दगड-विटाच्या ढिगाऱ्यावर ढकलले. त्यामुळे आकाशच्या डाेक्याला दुखापत झाली.

याप्रकरणी अराेली पाेलिसांनी भादंवि कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपी आकाश झडावणे यास अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक ऋषिकेश चाबुकस्वार करीत आहेत.

Web Title: Young seriously injured in fatal attack