मैत्रिणीला कार्यस्थळी सोडण्यासाठी गेलेला तरुण अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST2021-06-20T04:07:51+5:302021-06-20T04:07:51+5:30

नागपूर - मैत्रिणीला तिच्या कर्तव्यावर सोडून देण्यासाठी निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला भरधाव वाहनचालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे त्याचा करुण अंत ...

A young man who went to leave his girlfriend at work was killed in an accident | मैत्रिणीला कार्यस्थळी सोडण्यासाठी गेलेला तरुण अपघातात ठार

मैत्रिणीला कार्यस्थळी सोडण्यासाठी गेलेला तरुण अपघातात ठार

नागपूर - मैत्रिणीला तिच्या कर्तव्यावर सोडून देण्यासाठी निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला भरधाव वाहनचालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे त्याचा करुण अंत झाला. प्रवीण अनिल भोसकर (वय २५) असे मृताचे नाव आहे. त्याची मैत्रिण प्रियंका गालबोटे (वय २२) ही या अपघातात जखमी झाली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास धरमपेठ कॉलेजजवळ हा अपघात घडला.

रामेश्वरी, कावरापेठ भागात राहणारा प्रवीण खासगी रुग्णालयात सेवारत होता. प्रियंकासुद्धा तेथेच कार्यरत आहे. तिला कर्तव्यावर सोडून देण्यासाठी प्रवीण दुचाकीने जात होता. महामेट्रो स्टेशन, धरमपेठ कॉलेजजवळ भरधाव पिकअप व्हॅनच्या चालकाने प्रवीणच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे प्रवीणचा मृत्यू झाला तर प्रियंका जखमी झाली. अपघातामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती कळताच अंबाझरीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. प्रवीणच्या आई पुष्पा अनिल भोसकर (वय ५२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनिरीक्षक डोळे यांनी आरोपी वाहनचालक राजू रामकृष्ण मोहाडे (वय ३५, रा. वर्धमाननगर) याला अटक केली.

Web Title: A young man who went to leave his girlfriend at work was killed in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.