शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या शोधातील तरुण अडकला टेलिग्राम टास्कच्या जाळ्यात, २.८० लाखांचा गंडा

By योगेश पांडे | Updated: November 22, 2023 17:11 IST

ॲपवर रिझ्युम अपलोड करणे पडले महागात

नागपूर : नोकरीच्या शोधात असणाऱ्या एका तरुणाला एका ॲपवर आपला रिझ्युम अपलोड करणे फारच महागात पडले. सायबर गुन्हेगारांनी त्याला टेलिग्राम टास्कच्या जाळ्यात ओढत २.८० लाखांचा गंडा घातला. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

सूरजराज रमेशराव शेंडे (३४, राणी दुर्गावती नगर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो ऑनलाईन माध्यमांतून नोकरी शोधत होता. त्याने अपना नाम या ॲपवर स्वत:चा रिझ्युम अपलोड केला होता. ३ नोव्हेंबर रोजी त्याला एका व्यक्तीचा फोन आला व साईडएअर वर्ल्ड या कंपनीतून बोलत असल्याचे सांगत ‘साईड नेटवर्क’ या कंपनीत विमानाची तिकीटे बुक करण्याचे ऑनलाईन काम असल्याची बतावणी केली. या कामात पैसे लावल्यास जास्त नफा मिळेल असे आमीष दाखविले व सुरुवातीच्या कामावर टेलिग्राम ॲपच्या खात्यावर रक्कम पाठवली. त्यामुळे सूरजराजचा विश्वास बसला.

आरोपींनी त्यानंतर गुंतवणूकीवर नफ्याचे आमीष दाखवत वेगवेगळ्या खात्यांवर २.८० लाख रुपये पाठविण्यास सांगितले. मात्र कुठलाही नफा दिला नाही. सूरजराजने समोरील व्यक्तीला रक्कम परत मागितली असता आणखी पैसे भरावे लागतील असे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सूरजराजने पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीMONEYपैसाnagpurनागपूर