दाेघांनी केली तरुणास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:08 IST2021-04-25T04:08:28+5:302021-04-25T04:08:28+5:30

कन्हान : डॅम्पिंग यार्डात लाेखंडाचे तुकडे उचलण्याच्या क्षुल्लक वादातून दाेघांनी तरुणास मारहाण करीत जखमी केले, शिवाय आराेपींनी त्यास जीवे ...

The young man was beaten by Dagha | दाेघांनी केली तरुणास मारहाण

दाेघांनी केली तरुणास मारहाण

कन्हान : डॅम्पिंग यार्डात लाेखंडाचे तुकडे उचलण्याच्या क्षुल्लक वादातून दाेघांनी तरुणास मारहाण करीत जखमी केले, शिवाय आराेपींनी त्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना कन्हान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खदान क्रमांक ४ कन्हान येथे शुक्रवारी (दि.२३) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

भारत शामलाल कारके (२५, रा. खदान नं. ४, कन्हान) असे जखमी तरुणाचे नाव असून, गणेश प्रजापती व साेनू प्रजापती दाेघेही रा. खदान नं. ४, कन्हान, अशी आराेपींची नावे आहेत. भारत हा आपल्या भाऊजीसाेबत डॅम्पिंग यार्डाजवळ काेळसा व लाेखंडाचे तुकडे उचलण्यासाठी गेला असता, दाेन्ही आराेपी तेथे काेळसा व लाेखंडाचे तुकडे वेचत हाेते. अशात आराेपीने जमा केलेले लाेखंडी तुकडे न दिसल्याने त्यांनी भारतने लाेखंडी तुकडे घेतल्याच्या कारणावरून संशय घेत त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर भारत व आराेपी आपापल्या घरी गेले. दरम्यान सायंकाळी भारत परिसरातून जात असताना आराेपींनी त्याच्याशी वाद घालत लाेखंडी सळाकीसारख्या वस्तूने डाेक्यावर प्रहार करून भारतला जखमी केले. तसेच आराेपींनी त्याला हाताबुक्कीने मारहाण केली व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपींचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास सहायक फाैजदार जाेसेफ करीत आहेत.

Web Title: The young man was beaten by Dagha