काटाेल : दळण आणण्यासाठी जात असलेल्या तरुणास भरधाव अज्ञात वाहनाने जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना काटाेल शहरातील गळपुरा चाैकात नुकतीच घडली.
ईश्वर मंगल सुरजुसे (३०, रा. अर्जुननगर, काटाेल) असे मृताचे नाव आहे. ईश्वर हा दळण आणण्यासाठी गळपुरा चाैकात आला हाेता. त्यातच भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने जाेरात धडक दिल्याने ताे गंभीर जखमी झाला. काटाेल शहरातील ग्रामीण रुग्णालयात प्रथमाेपचार केल्यानंतर त्याला नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी ईश्वरची पत्नी सीमा सुरजुसे (३०) हिच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार पंचफुला माेरे करीत आहेत.