आक्षेपार्ह वस्तू ठेवणाऱ्या तरुणाला खांबाला बांधले
By Admin | Updated: February 5, 2017 02:21 IST2017-02-05T02:21:12+5:302017-02-05T02:21:12+5:30
जागनाथ बुधवारी येथील एका धार्मिक स्थळी आक्षेपार्ह वस्तू ठेवणाऱ्या तरुणाला लोकांनी पकडून खांबाला बांधले.

आक्षेपार्ह वस्तू ठेवणाऱ्या तरुणाला खांबाला बांधले
जागनाथ बुधवारीतील धार्मिक स्थळाजवळील प्रकार
नागपूर : जागनाथ बुधवारी येथील एका धार्मिक स्थळी आक्षेपार्ह वस्तू ठेवणाऱ्या तरुणाला लोकांनी पकडून खांबाला बांधले. राहुल शाहू (वय २५ वर्षे) रा. रायपूर असे त्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाचे वडील रायपूर येथे राहत असून, तो शहरात टेंटचे काम करीत असल्याची माहिती आहे.
माहिती सूत्रानुसार हा तरुण मागील काही आठवड्यापासून या स्थळी आक्षेपार्ह वस्तू ठेवत होता. त्यामुळे येथील पदाधिकारी आणि कर्मचारी त्याचा शोध घेत होते. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनेसुद्धा त्या तरुणाचा शोध घेतल्या जात होता. शेवटी शनिवारी सकाळी येथे साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला एक संशयित तरुण दिसला. यानंतर लोकांनी त्याला पकडून, खांबाला दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर पोलिसांना त्याची माहिती दिली.(प्रतिनिधी)