विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:08 IST2021-03-19T04:08:21+5:302021-03-19T04:08:21+5:30

नरखेड : शेतातील विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील येणीकाेनी शिवारात मंगळवारी (दि.१६) दुपारच्या ...

Young man drowns in well | विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

नरखेड : शेतातील विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील येणीकाेनी शिवारात मंगळवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

मुकेश रामकृष्णाजी भुसारी (३५, रा. येणीकाेनी, ता. नरखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. साेमवारी (दि.१५) दुपारी १ वाजताच्या सुमारास मुकेश हा त्याचे काका वासुदेव गाेपाळराव भुसारी (५३, रा. येणीकाेनी) यांचा जेवणाचा डबा घेऊन शेतात आला व त्यानंतर ताे आपल्या शेतात ओलित करण्यासाठी जाताे म्हणून निघून गेला. दरम्यान, दुपारी ४ वाजताच्या सुमारास मुकेशचा माेठा भाऊ दिनेश हा शेतात आला असता, त्याला मुकेश कुठेही दिसला नाही. ही बाब दिनेशने काका वासुदेव यांना सांगितली व सांगून शेतात सर्वत्र मुकेशचा शाेध घेतला. मात्र ताे कुठेही आढळून न आल्याने मंगळवारी नरखेड पाेलीस ठाण्यात त्याच्या हरविल्याची तक्रार दिली. दरम्यान, मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास शेतातील विहिरीत मुकेशचा बुडून मृत्यू झाल्याचे आढळून आले. याप्रकरणी वासुदेव गाेपाळराव भुसारी (५३, रा. येणीकाेनी) यांच्या तक्रारीवरून नरखेड पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस हवालदार प्रकाश खाेपे करीत आहेत.

Web Title: Young man drowns in well