विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:14 IST2021-02-28T04:14:29+5:302021-02-28T04:14:29+5:30

काटाेल : धावत असताना तरुण अनावधानाने जमिनीला समांतर असलेल्या विहिरीत काेसळला आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना ...

Young man drowns in well | विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

काटाेल : धावत असताना तरुण अनावधानाने जमिनीला समांतर असलेल्या विहिरीत काेसळला आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हेटी शिवारात गुरुवारी (दि.२५) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

पंकज अनिल परतेती (२८, रा.ओरडाेह, ता.काटाेल) असे मृत तरुणचे नाव आहे. पंकज गुरुवारी रात्री हेटीहून बाेरडाेहकडे धावत येत हाेता. या राेडच्या कडेला विहीर असून, ती जमिनीला सपाट असल्याने फारशी नजरेस पडत नाही. रात्रीच्या वेळी अंधार असल्याने ती विहीर पंकजच्याही निदर्शनास आली नाही. त्यामुळे ताे विहिरीत पडला. पाेहता येत नसल्याने त्याचा विहिरीतच बुडून मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. या प्रकरणी काटाेल पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक वानखेडे करीत आहेत.

Web Title: Young man drowns in well