तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:41 IST2021-02-05T04:41:54+5:302021-02-05T04:41:54+5:30

माैदा : कन्हान नदीच्या पात्रात अंघाेळ करण्यासाठी गेलेला तरुण बुडाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना माैदा पाेलीस ...

Young man drowns in river | तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

माैदा : कन्हान नदीच्या पात्रात अंघाेळ करण्यासाठी गेलेला तरुण बुडाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चक्रधर घाट परिसरात घडली.

आमीर अहमद अन्सारी (२०, रा. नागपूर) असे मृताचे नाव आहे. आमीर हा कॅटरिंगच्या कामासाठी नागपूरहून माैदा येथे आला हाेता. त्याच्यासाेबत १९ जण हाेते. कामाला वेळ असल्याने ताे यातील आठ जणांसाेबत माैदा परिसरातील कन्हान नदीच्या चक्रधर घाट येथे अंघाेळ करण्यासाठी गेला हाेता. पात्रात अंघाेळ करीत असताना अनावधानाने ताे खाेल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला. वेळीच वाचविणे शक्य न झाल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस हवालदार चांगदेव कुथे करीत आहेत.

Web Title: Young man drowns in river