तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:07 IST2021-07-05T04:07:30+5:302021-07-05T04:07:30+5:30

कुही : मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण ताेल गेल्याने तलावात पडला व खाेल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना ...

Young man drowns in lake | तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

कुही : मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण ताेल गेल्याने तलावात पडला व खाेल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उंद्रीगाव शिवारातील तलाव येथे शुक्रवारी (दि.२) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.

विनाेद नंदलाल नेताम (३६, रा. केसाेरी, ता. देवरी, जि. गाेंदिया, ह.मु. पवन बियाणी खदान, पाचगाव, ता. उमरेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत विनाेद तलावात मासे पकडण्यासाठी गेला हाेता. अशात अचानक ताेल गेल्याने तो तलावात पडला. त्याला पाेहता येत नसल्याने त्याचा खाेल पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी लक्ष्मी विनाेद नेताम (३०, रा. केसाेरी, ता. देवरी, जि. गाेंदिया, ह.मु. पवन बियाणी खदान, पाचगाव, ता. उमरेड) यांच्या तक्रारीवरून कुही पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस हवालदार दिलीप लांजेवार करीत आहेत.

Web Title: Young man drowns in lake