तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:09 IST2021-05-18T04:09:05+5:302021-05-18T04:09:05+5:30

कुही : पाेहण्यासाठी तलावात उतरलेल्या तरुणाचा खाेल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मटकाझरी तलाव ...

Young man drowns in lake | तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

कुही : पाेहण्यासाठी तलावात उतरलेल्या तरुणाचा खाेल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मटकाझरी तलाव येथे रविवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास घडली.

रुचित कृष्णराव कडू (२८, रा. म्हाळगीनगर, नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. रुचित हा शेख साहील शेख सुलतान (२१), शेख सागीर शेख असलहुल्ला (२८), कवडू गिरडे (२५), शेख माेसीम शेख सलीम (३५), शेख जाक्विक शेख रशीद (२८), रघुनाथ इवनाते (२४) या सहा मित्रांसाेबत पाचगावजवळील मटकाझरी दर्गा येथे फिरण्यासाठी आले हाेते. त्यांनी मटकाझरी तलावाजवळ पाेहा बनविला. अशात रुचितला तलावात पाेहण्याचा माेह झाल्याने ताे तलावात उतरला. मात्र, खाेल पाण्यात गेल्याने ताे गटांगळ्या खाऊ लागला. मित्रांनी त्याला वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. घटनेची माहिती मिळताच पाचगाव पाेलीस चाैकीचे पाेलीस उपनिरीक्षक भरत थिटे, अमित पवार, मेजर संजय कानडे घटनास्थळी पाेहाेचले. दुपारी रुचितचा मृतदेह तलावातून काढण्यात आला. कुही पाेलिसांनी घटनेची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.

Web Title: Young man drowns in lake