काेच्छी बॅरेजमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:07 IST2021-06-21T04:07:28+5:302021-06-21T04:07:28+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर/खापा : पिकनिकसाठी आलेला तरुण पाेहण्याचा माेह न आवरल्याने काेच्छी बॅरेजमध्ये उतरला आणि त्यातच त्याचा बुडून ...

Young man drowns in Kaechchi barrage | काेच्छी बॅरेजमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

काेच्छी बॅरेजमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर/खापा : पिकनिकसाठी आलेला तरुण पाेहण्याचा माेह न आवरल्याने काेच्छी बॅरेजमध्ये उतरला आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि. २०) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

निखिल तुमसरे (२३, रा. सावनेर) असे मृताचे नाव आहे. निखिल त्याच्या सावनेर शहरातील मित्रांसाेबत काेच्छी (ता. सावनेर) गावाजवळील कन्हान नदीवरील काेच्छी बॅरेज परिसरात पिकनिकसाठी आला हाेता. त्याला पाेहताही येत हाेते. त्यामुळे मित्रांसाेबत निखिलही पाेण्यासाठी पाण्यात उतरला. पाेहता पाेहता ताे खाेल पाण्यात गेला. काही वेळात ताे गटांगळ्या खाऊ लागला. त्यामुळे मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ताे पाण्यात दिसेनासा झाल्याने मित्रांनी निखिलच्या कुटुंबीयांसह पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून स्थानिक पाेहणाऱ्या तरुणांच्या मदतीने त्याचा पाण्यात शाेध घेतला. तरुणांनी काही वेळात त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. याप्रकरणी खापा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे करीत आहेत.

Web Title: Young man drowns in Kaechchi barrage