सांड नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:12 IST2021-09-09T04:12:53+5:302021-09-09T04:12:53+5:30

रेवराल : धानला-नवेगाव मार्गालगत असलेल्या सांड नदीत बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.७) दुपारी ४ वाजताच्या सुमारास ...

Young man drowns in bull river | सांड नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

सांड नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

रेवराल : धानला-नवेगाव मार्गालगत असलेल्या सांड नदीत बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.७) दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.

कैलास श्यामराव वाकडे (३५, रा.धानला, ता.माैदा) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास धानला शिवारातील बाळकृष्ण राजगिरे यांच्या शेतालगत सांड नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पाेलीस अधिकारी मुख्तार बागवान, माैद्याचे तहसीलदार मलिक विराणी, पाेलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे, धानला येथील तलाठी व सुमारे १०० पाेलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला हाेता. इतक्या माेठ्या प्रमाणात पाेलीस ताफा कशासाठी लावण्यात आला, हे कळू शकले नाही. उत्तरीय तपासणी केल्यानंतर, मृतदेह बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कुटुंबीयांच्या सुपुर्द करण्यात आला व धानला येथे अंत्यसंस्कार पार पडले. कैलासच्या अकाली मृत्यूमुळे धानला परिसरात शाेककळा पसरली आहे. त्याच्यापश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे.

080921\img_20210908_182721.jpg

सांद नदीत बुडून एकाचा मृत्यू फोटो

Web Title: Young man drowns in bull river