दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:08 IST2021-05-31T04:08:00+5:302021-05-31T04:08:00+5:30

बेला : भरधाव दुचाकीची सायकलस्वाराला धडक लागली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बेला ...

Young man dies in two-wheeler accident | दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

बेला : भरधाव दुचाकीची सायकलस्वाराला धडक लागली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बेला पाेलीस ठाण्यांतर्गतच्या महालगाव परिसरात नुकतीच घडली.

प्रफुल गाेपाळराव भाेयर (२९, रा. महालगाव, ता. भिवापूर), असे मृताचे नाव आहे. प्रफुल हा शंकर धाेटे यांच्या मालकीच्या दुचाकीने (क्र. एमएच-४०/बीक्यू-४६४१) चिखलापार येथे गेला हाेता. दरम्यान, काम आटाेपून गावी येत असताना महालगाव परिसरात त्याने राेडने जाणाऱ्या सायकलस्वार गजानन सूर्यभान पाटील यांना मागून धडक दिली. त्यात प्रफुल स्वत: गंभीर जखमी झाला. त्याला नागपूर मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान २४ मे राेजी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बेला पाेलिसांनी भादंवि कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस हवालदार अशाेक जाधव करीत आहेत.

Web Title: Young man dies in two-wheeler accident