दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:08 IST2021-03-01T04:08:59+5:302021-03-01T04:08:59+5:30

देवलापार : भरधाव दुचाकीचे चाक पंक्चर झाल्याने ताेल जाऊन दुचाकीस्वार राेडवर पडला. त्यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ...

Young man dies in two-wheeler accident | दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

देवलापार : भरधाव दुचाकीचे चाक पंक्चर झाल्याने ताेल जाऊन दुचाकीस्वार राेडवर पडला. त्यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना देवलापार पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बांद्रा शिवारात शनिवारी (दि.२७) मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडली.

तुषार अंकुश वरठी (२२, रा. सिंदेवानी, ता. रामटेक) असे मृत तरुणाचे नाव आहे. तुषार हा आपल्या एमएच-४०/एजे-८५८९ क्रमांकाच्या दुचाकीने जबलपूर येथून वडंबामार्गे देवलापारकडे येत हाेता. दरम्यान, बांद्रा शिवारात त्याच्या दुचाकीचे समाेरील चाक पंक्चर झाल्याने ताेल जाऊन ताे राेडवर पडला. यात गंभीररीत्या दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवलापार पाेलिसांनी भादंवि कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक पुंजरवाड करीत आहेत.

Web Title: Young man dies in two-wheeler accident