दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:43 IST2021-02-05T04:43:04+5:302021-02-05T04:43:04+5:30
भिवापूर : चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीचा अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झालेल्या मागे बसलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
भिवापूर : चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीचा अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झालेल्या मागे बसलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्यांतर्गतच्या जावराबाेडी शिवारात नुकतीच घडली.
अक्षय सागर रामटेके (२७, रा. गाेंडबाेरी, ता. भिवापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. अक्षय हा गुरुदेव जयराम चहांदे (३५, रा. सावित्रीबाई फुलेनगर, नागपूर) याच्यासाेबत एमएच-४९/बीपी-२३६० क्रमांकाच्या दुचाकीने भिवापूर येथून गाेंडबाेरी येथे जात हाेते. दरम्यान, जावराबाेडी शिवारात दुचाकीचालक गुरुदेवचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकीला अपघात झाला. त्यात अक्षयला गंभीररीत्या दुखापत झाली. त्यास नागपूर मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान अक्षयचा मृत्यू झाला. याप्रकरणी राजकुमार नारायण चहांदे (४२, रा. गाेंडबाेरी) यांच्या तक्रारीवरून भिवापूर पाेलिसांनी भादंवि कलम २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक भस्मे करीत आहेत.