वीज काेसळून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:08 IST2021-04-20T04:08:54+5:302021-04-20T04:08:54+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : वादळ सुरू असताना घराच्या अंगणात आवराआवर करीत असलेल्या तरुणाच्या अंगावर वीज काेसळली. त्यात हाेरपळून ...

वीज काेसळून तरुणाचा मृत्यू
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : वादळ सुरू असताना घराच्या अंगणात आवराआवर करीत असलेल्या तरुणाच्या अंगावर वीज काेसळली. त्यात हाेरपळून तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना भिवापूरनजीकच्या तास येथेे साेमवारी (दि.१९) दुपारच्या सुमारास घडली.
संदीप शेषराव बाेरकर (३४, रा. तास, ता. भिवापूर) असे मृताचे नाव आहे. साेमवारी दुपारच्या सुमारास भिवापूर तालुक्यातील काही भागात वादळी वारा व विजांचा कडकडाट सुरू हाेता. अचानक वादळ सुरू झाल्याने मृत संदीप हा घराच्या अंगणातील साहित्याची आवराआवर करीत हाेता. अशातच जाेरदार कडाडलेली वीज थेट त्यांच्या अंगावर काेसळल्याने हाेरपळून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. लगेच गावकऱ्यांनी त्यास भिवापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. घरातील कर्ता व्यक्ती असलेल्या संदीपच्या अकाली मृत्युमुळे बाेरकर कुटुंबीयांवर माेठा आघात झाला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, चार वर्षांची मुलगी व आईवडील आहेत.
दरम्यान, तलाठी प्रशांत आंभाेरे यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा प्राथमिक अहवाल तहसीलदारांकडे पाठविला आहे. भिवापूर पाेलिसांनी घटनेची नाेंद केली असून, ठाणेदार महेश भाेरटेकर यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू केला आहे.