मेमाेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:09 IST2021-03-16T04:09:15+5:302021-03-16T04:09:15+5:30
कामठी : इतवारी-गाेंदिया मेमाे लाेकलच्या धडकेत तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१४) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास कळमना-कामठी ...

मेमाेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
कामठी : इतवारी-गाेंदिया मेमाे लाेकलच्या धडकेत तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१४) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास कळमना-कामठी रेल्वे मार्गावरील येरखेडा परिसरात घडली.
शिशुपाल भैयालाल वरखडे (३५, रा. बीबी काॅलनी, न्यू येरखेडा, कामठी) असे मृत तरुणाचे नाव आहे. इतवारी-गाेंदिया मेमाे लाेकल (गाडी क्रमांक ०८७४३) रेल्वे इतवारी स्थानकावरून कळमना मार्गे कामठीकडे जात हाेती. यादरम्यान येरखेडा परिसरात रेल्वे लाईन ओलांडत असताना, शिशुपालला मेमाेची धडक लागली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक व्ही. जी. कार्वेकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी नवीन कामठी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस करीत आहेत.