विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:13 IST2021-08-20T04:13:07+5:302021-08-20T04:13:07+5:30

माैदा : काम करीत असताना तरुणाचा काॅम्प्रेसर मशीनला स्पर्श झाला व त्याला जाेरात विजेचा धक्का लागला. त्यातच त्याचा मृत्यू ...

Young man dies of electric shock | विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

माैदा : काम करीत असताना तरुणाचा काॅम्प्रेसर मशीनला स्पर्श झाला व त्याला जाेरात विजेचा धक्का लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भूगाव येथे नुकतीच घडली.

दर्शन दामाेदर वालदे (२०, रा. तांडा, ता. माैदा) हा भूगाव (ता. कामठी) येथे मूर्ती तयार करण्याचे काम करायचा. काम करीत असताना त्याचा काॅम्प्रेसर मशीनला स्पर्श झाला. त्या मशीनमध्ये वीजप्रवाह प्रवाहित असल्याने त्याला विजेचा धक्का लागला. त्यामुळे ताे बेशुद्ध पडला. त्याला भूगाव येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात प्रथमाेपचार करून नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये नेले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस हवालदार बकाल करीत आहेत.

Web Title: Young man dies of electric shock