विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:07 IST2021-07-15T04:07:44+5:302021-07-15T04:07:44+5:30

कामठी : जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने विजेचा जबर धक्का लागला. त्यात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कामठी ...

Young man dies of electric shock | विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

कामठी : जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने विजेचा जबर धक्का लागला. त्यात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कामठी शहरातील तुमडीपुरा, साेनार ओळी येथे मंगळवारी (दि.१३) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

किशाेर पुंडलिक चाैधरी (३६, रा. तुमडीपुरा, कामठी) असे मृत तरुणाचे नाव असून, ताे साेनार ओळीतील एका हाॅटेलमध्ये कामाला हाेता. मंगळवारी रात्री हाॅटेलमधून घरी आल्यानंतर घरातील विद्युत मीटरला जाेडलेल्या जिवंत अर्थिंग तारेला स्पर्श झाल्याने किशाेरला विजेचा जाेरात धक्का लागला. कुटुंबीयांनी लगेच त्याला कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक रामदास पाटील करीत आहेत.

Web Title: Young man dies of electric shock