विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:08 IST2021-03-22T04:08:34+5:302021-03-22T04:08:34+5:30

वाडी : घराच्या छतावर भिंतीला हाताेडीने खिळा ठाेकत असताना अचानक विजेचा धक्का लागला आणि तरुण फेकला गेला. त्यात गंभीर ...

Young man dies of electric shock | विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

वाडी : घराच्या छतावर भिंतीला हाताेडीने खिळा ठाेकत असताना अचानक विजेचा धक्का लागला आणि तरुण फेकला गेला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना वाडी शहरातील खडगाव राेडवर रविवारी (दि. २१) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

गजानन ऊर्फ श्याम महादेव अडले (३४, रा. टेकडी वाडी) असे मृताचे नाव आहे. त्याचे इंदिरानगर, खडगाव राेड येथे हार्डवेअरचे दुकान असून, या दुकानासमाेर नुकतेच घराचे बांधकाम केले. ताे रविवारी सकाळी लहान भाऊ नंदकिशोर अडले, नातेवाईक मधुकर हांडे व नीलेश हांडे यांच्या मदतीने दुकानाला लावलेले बॅनर हवेने हलत असल्याने ते व्यवस्थित करत हाेता. ते बॅनर बांधण्यासाठी ताे इमारतीच्या छतावर हाताेडीने खिळा ठाेकत असतानाच त्याला जाेरात विजेचा धक्का लागला. ही बाब लक्षात येताच इतरांनी त्याला लगेच नजीकच्या दवाखान्यात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. त्याचे २०१६ मध्ये लग्न झाले हाेते. त्याला दाेन वर्षांची मुलगीदेखील आहे. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Young man dies of electric shock