विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:43 IST2021-02-05T04:43:20+5:302021-02-05T04:43:20+5:30
खापरखेडा : नदीपात्रात मासे पकडताना विजेचा जबर धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वलनी ...

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
खापरखेडा : नदीपात्रात मासे पकडताना विजेचा जबर धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वलनी घाट येथे शनिवारी (दि.३०) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. रामपवन जगन गाैतम (२७, रा. वाॅर्ड क्र. ६, वलनी खदान) असे मृत तरुणाचे नाव आहे. रामपवन हा कन्हान नदीपात्राच्या वलनी घाट येथे मासे पकडत असताना त्याला विजेचा धक्का लागला व ताे पाण्यात पडला. लागलीच त्याला बाहेर काढून वलनी हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी विष्णू जगन गाैतम (३६, रा. वाॅर्ड क्र. ६, वलनी खदान) यांच्या तक्रारीवरून खापरखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सहायक फाैजदार मुकुंदा लाेदे करीत आहेत.