तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:42 IST2021-02-05T04:42:05+5:302021-02-05T04:42:05+5:30
काटाेल : तरुणाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वंडली (सावरगाव) शिवारात मंगळवारी ...

तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
काटाेल : तरुणाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वंडली (सावरगाव) शिवारात मंगळवारी (दि. २६) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
नीलेश चंद्रमणी तागडे (२६, रा. मसली, ता. काटाेल) असे मृत तरुणाचे नाव आहे. नीलेश बुधवारी सकाळपासून कुणाशी बाेलत नव्हता. त्यातच ताे विक्षिप्तासारखा वागत हाेता. कुणाचेही लक्ष नसताना ताे शेताकडे धावत गेला आणि शेतातील विहिरीत उडी घेतली, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सहायक फाैजदार जवाहर चव्हाण करीत आहेत.