तरुणाची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:09 IST2021-04-10T04:09:23+5:302021-04-10T04:09:23+5:30

बेला : तरुणाने झाडाच्या फांदीला दाेरीच्या मदतीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बेला (ता. उमरेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील ...

Young man commits suicide by hanging | तरुणाची गळफास लावून आत्महत्या

तरुणाची गळफास लावून आत्महत्या

बेला : तरुणाने झाडाच्या फांदीला दाेरीच्या मदतीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बेला (ता. उमरेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव शिवारात गुरुवारी (दि. ८) सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

प्रशांत नारायण गेडेकर (३०, रा. वडगाव, ता. उमरेड) असे मृताचे नाव आहे. काही शेतकरी शेतात जात असताना त्यांना प्रशांत कारखान्याच्या मागच्या भागाला असलेल्या कालव्याच्या तीरावरील टेंभुर्णीच्या झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. ताेपर्यंत त्याचा मृत्यू झाला हाेता. त्यांनी मृतदेह खाली काढून उत्तरीय तपासणीसाठी उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी बेला पाेलिसांनी नारायण गेडेकर (६६, रा. वडगाव) यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार अशाेक जाधव करीत आहेत.

Web Title: Young man commits suicide by hanging